WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई पदाची भरती निघालेली आहे, मुंबई उच्च न्यायालयाने या भरती बद्दल आपली जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये शिपाई पदासाठी 45 जागांसाठी भरती राबविण्यात येणार आहे.
पदाचे नाव आणि जागा
मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठात शिपाई पदाची एकूण 45 जागांसाठी भरती काढलेली आहे. या भरती बद्दल इच्छुक उमेदवार कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे.
पात्रता आणि वय मर्यादा काय असणार आहे
- 1)राखीव म्हणजे खुला वर्गांसाठी कमीत कमी 18 वर्ष असणार आहे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असणार आहे .
- 2)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि 38 वर्ष पर्यंत वयोमर्यादा असणार आहे.
- 3) विहित मार्गाने ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी 18 वर्षे वय मर्यादा असणार आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे कितीही असू शकते .
- 3) उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि त्यांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता आली पाहिजे . आणि उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ असणे गरजेचे आहे.
इतर महत्त्वाच्या बाबी
- तुम्हाला या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी 50 रुपये ही शुल्क राहणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2025 इतकी आहे .
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा
0 Comments